मुंबई

25 लाख परप्रांतीय मजूर अखेर मुंबईत परतले


मुंबई दि.13 सप्टेंबर :- लॉकडाऊन सुरू होताच रोजगार बंद असल्याने आपआपल्या राज्यातील गावाला निघून गेलेले परप्रांतीय मजुरांनी पुन्हा मुंबईची वाट धरली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत सुमारे 25 लाख परप्रांतीय मजूर रेल्वे मार्गे मुंबईत परतले आहेत.
23 मार्चपासून कोरोना लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मुंबईतील हातावर पोट असणाऱया मजुरांनी वाहतूक ठप्प असल्याने पायीच आपआपल्या राज्याची वाट धरली होती.
त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने 1 मेपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरू केल्या. त्यानंतर 12 मे पासून राजधानी धर्तीच्या वातानुकूलित गाडय़ा दिल्ली ते देशाच्या 15 शहरांमध्ये सुरू केल्या. तसेच 1 जूनपासून ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळीत 200 आरक्षित मेल-एक्सप्रेस गाडय़ांना सुरुवात झाली. लॉकडाऊन शिथील झाल्याने तसेच कार्यालये, दुकाने उघडण्याची तसेच टॅक्सी सेवांना प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी मिळाल्याने मुंबईत मजुरांनी मोठय़ा संख्येने परतण्यास सुरुवात केली आहे.

  • टप्प्या टप्प्याने मजूर परतले
    मध्य रेल्वेवर 15 स्पेशल मेल-एक्सप्रेस विविध राज्यातून मजूरांना घेऊन रोज कल्याण, ठाणे, एलटीटी आणि सीएसएमटी येथे रिकाम्या होत आहेत. मध्य रेल्वेचा विचार करता मुंबई महानगर प्रदेशामध्ये 16.50 लाख परप्रांतीय प्रवासी परतले आहेत. जूनमध्ये 4 लाख, जुलैमध्ये 6 लाख आणि ऑगस्ट 2020 मध्ये 6.5 लाख प्रकासी मजूर मुंबईत पुन्हा परतल्याचे रेल्वेच्या अधिकाऱयांनी सांगितले. तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस या दोन स्थानकांत 12 मे ते 31 ऑगस्ट दरम्यान 9 लाख 47 हजार 560 परराज्यातील प्रवासी परतल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!