बीड

24 तासाच्या शोध मोहीमेनंतर बेपत्ता तरुणाचा ‘बिंदूसरा’त सापडले मृत्यदेह; घातपात असल्याचा नातेवाईकांनी केला आरोप


बीड, दि.6 (लोकाशा न्युज) ः शहरातील धानोरा रोड संत नामदेव नगर येथील हरीश पोपटराव उबाळे 20 वर्षीय तरूण शनिवारी दि.6 सप्टेंबर रोजीपासून बेपत्ता झाला होता. या बेपत्ता तरूणाची मोटारसायकल शहरापासून जवळच असलेल्या बिंदूसरा धरणाजवळ आढळून आल्याने तरूण बिंदूसरा तलावामध्ये बुडाल्याचा संशय व्यक्त करत ग्रामीण पोलीस व आग्नीशामक दलाकडून रविवारी सकाळपासून तलावात शोध मोहिम सुरू ठेवले अखेर 24 तास शोधमोहीम सुरू ठेवल्यानंतर हरीश उबाळे या तरुणाचा प्रेत बिंदुसरा धरणात सापडला असून कुटुंबियांनि आमच्या घरात कुठलाही वाद झाला नसून आमच्या मुलासोबत घातपात झाला असल्याचा आरोप केला आहे. सदरील मृत्यदेह पोलिसांनी ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हारुग्णायात दाखल करत आहेत. पीएम रिपोर्ट दिल्यानंतरच काय प्रकार आहे ते समोर येईल

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!