बीड राजकारण

पाटोद्याच्या आरोग्य केंद्रावर आ. पवार खुश; उत्तम आरोग्य सेवेबाबत केले व्टिट

बीड,दि.7(लोकाशा न्यूज): जिथं कुठं चांगली गोष्ट असते तिथं जाऊन ती पाहण्याचा व समजून घेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो असे सांगत आ. रोहित पवार यांनी रविवारी पाटोदा आरोग्य केंद्रा भेट देत तिथे दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवेबाबत डॉक्टर, नर्स यांच्याशी चर्चा करून माहिती असल्याचे व्टिट केले आहे.
महाराष्ट्र शासनाकडून बीड जिल्ह्यातील पाटोदा आरोग्य केंद्राला उत्तम आरोग्य सेवा देत असल्याचा पुरस्कार देण्यात आला. तेथील चांगल्या कामाचा आढावा व माहिती घेण्यासाठी आमदार रोहित पवार स्वतः रविवार दि. 06 सप्टेंबर रोजी भेट देवून दिल्या जाणार्‍या उत्तम आरोग्य सेवेबाबत डॉक्टर व नर्स यांच्याशी चर्चा करत माहिती घेतली आणि जिथं कुठं चांगली गोष्ट असते तिथं जाऊन ती पाहण्याचा, समजून घेण्याचा माझा नेहमी प्रयत्न असल्याचे ट्विट केले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!