देश विदेश

फक्त 1 रूपयात कोरोना घालवा; दावा खोटा ठरल्यास पाच लाख मिळवा


दिल्ली, दि.6 (लोकाशा न्युज) :– संपूर्ण जगभर थैमान घातलेला कोरोना हा संसर्गजन्य आजार आता फक्त एक रुपयात घरगुती पद्धतीने बरा होऊ शकतो असा दावा आंध्र प्रदेशातील रंगा व्यंकटेश्वर राव यांनी केला आहे. हा दावा खोटा निघाल्यास पाच लाख रुपये बक्षीस देण्याचीही राव यांची तयारी आहे. त्यांनी यापूर्वी केलेल्या निस्वार्थी सेवेबद्दल राव यांना राष्ट्रपती पदक देखील मिळालेले आहे.
हा घरगूती इलाज जादु सारखा असल्याचे सांगत राव म्हणाले की, आपण आपल्या दोन्ही नाकपुड्यामध्ये लिंबाच्या रसाचा एक थेंब ठेवल्यास नाक, घसा व फुफ्फुसामध्ये पडलेला विषाणू- कफ स्वरूपात तोंडातून बाहेर येतो. जे आपल्याला थुंकावे लागते. नंतर कोमट पाण्यात लिंबाचा रस व मीठ घालून गुळण्या कराव्यात. नंतर बराच आराम वाटेल. यानंतर नाकपुडीमध्ये बोटांनी खोबरेल तेल लावावे. या सोप्या प्रक्रियेनंतरही जर कोणाला हे सिद्ध झाले की, आराम मिळाला नाही तर व्यंकटेश्वर राव आव्हान देतात की 5 लाख रूपयांचे बक्षीस देण्यास तयार आहेत. जेंव्हा कोरोना विषाणू संपूर्ण जग हादरवून टाकणारा खलनायक ठरला आहे, तेंव्हा रंगा व्यंकटेश्वरराव यांना हा एक सोपा, प्रभावी, निश्चित उपाय सापडला आहे.ते पुढे म्हणतात की, लिंबाचा रस सॅनिटायझर म्हणून आश्चर्यकारकपणे कार्य करतो. आपल्या हातावर व डोक्यावर लिंबाचा रस लावा, कपड्यांवर फवारणी करा आणि घरामध्ये शिंपडा, कोरोना व्हायरस आपल्यावर परिणाम करणार नाही असा दावा त्यांनी केला. रंगा व्यंकटेश्वरराव आंध्रप्रदेश मधील निदादावोल येथील रहिवासी आहेत. राव यांनी लायन्स क्लबचे अध्यक्ष आणि जिल्हा सेवा समन्वयक निदादावोल पश्चिम गोदावरी जिल्हा म्हणून काम पाहिले आहे.त्यांनी केवळ क्लबचेच नव्हे तर इतर विविध क्लबमध्ये देखील सेवा दिली आहे. त्यांना निस्वार्थ सेवेसाठी, सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी वरील उपायांची यशस्वीपणे स्वतःवर चाचणी केली व सकारात्मक परिणाम प्राप्त झाल्यावर, त्यांनी कोरोनाव्हायरसने संक्रमित झालेल्या अनेक राजकारण्यांना व इतरांना वरील उपाय सुचविले आहेत. सायनाईडच्या एका थेंबाने शत्रूला ठार मारले जाते, तर लिंबू रसाचा एक थेंब माणसाचे प्राण वाचवतो. सर्व आजारापासून मुक्त होऊ शकतात असेही राव यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!