मराठवाडा

‘जायकवाडी’चे ऐवढे दरवाजे उघडले; 2 हजार 637 क्युसेक्सने गोदापात्रात विसर्ग सुरू

पैठण, दि.5 (लोकाशा न्युज) ः जायकवाडी प्रकल्पाचे 2 दरवाजे शनिवारी दि.5 सप्टेंबर रोजी उघडले आहेत. प्रतिसेकंद 1 हजार 48 क्युसेक्स तर जलविद्युत केंद्रातून 1 हजार 589 असा एकुण 2 हजार 637 क्युसेक्स एवढा जलप्रवाह गोदावरी नदिपात्रात सोडला जात असल्याची अशी माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी दिली. जायकवाडी जलाशयात सध्या 6 हजार 181 क्युसेक्स या वेगाने नवीन पाणी दाखल होत आहे. एकुण पाणीसाठा 98 टक्क्यांवर पोहोचला आहे, अशी माहिती दगडी धरण उपविभागाचे जायकवाडी (उत्तर) येथील सहाय्यक अभियंता बुध्दभुषण दाभाडे यांनी दिली. दरम्यान नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहांतून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अखेर नाथसागर जलाशय काठोकाठ भरला आहे. त्यामुळे शनिवारी जायकवाडी धरणाच्या 22 पैकी 10 व 27 क्रमांकांचे 2 दरवाजे अर्धा फूट उघडून नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जायकवाडी धरणातुन दुपारी 12 वाजून 30 मिनिटानंतर ही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या दोन्ही दरवाज्यातून 1 हजार 48 क्यूसेक एवढ्या पाण्याचा विसर्ग गोदवारी नदीपात्रात सोडण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय जलविद्युत निर्मिती केंद्रातूनही 1 हजार 589 क्यूसेक एवढा जलप्रवाह शुक्रवारपासून सोडण्यात आलेला आहे. एकुण 2 हजार 637 क्यूसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू करण्यात आलेला आहे. आज सकाळी जलाशयात पाण्याची आवक 6 हजार 181 तर पाण्याची पातळी 97.57 टक्के इतकी होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!