बीड गेवराई

सिमेंट केमिकल्सचा टँकर पलटी; चालक जागीच ठार

कोळगाव परिसरातील घटना


बीड, दि.02(लोकाशा न्यूज) :- सिमेंट केमिकल घेवून जाणार्‍या टँकर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅकर रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कल्याण विशाखापट्टन महामार्गावर कोळवाडी परिसरात बुधवारी (दि.2) घडली.
घटनास्थळी महामार्ग पोलीस पोलीस उपनिरीक्षक गित्ते, व इतर कर्मचारी पोहचले आहेत. मृतदेह टँकरच्या बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येणार आहे. वाहतूक कोंडी होवू नये म्हणून टँकर रस्त्याच्या बाजुला घेण्यास चालू असल्याचे पोउपनि.गित्ते यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!