बीड

एकाच विहिरीत आढळले मावस बहीण-भावाचे मृतदेह; आत्महत्या की घातपात?

गेवराई तालुक्यातील माटेगाव शिवारातील घटना


गेवराई, (लोकाशा न्युज)   एका विहीरीमध्ये मावस बहीण भावाचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळुन आले. मागील दोन दिवसांपासून हे दोघे बेपत्ता असल्याचे नातेवाईकांकडून समजते आहे. तर या दोघांमध्ये मावस बहीण भावाचे नाते आहे. सदरील घटना गेवराई तालुक्यातील चकलांबा पोलीस ठाणे हद्दीतील माटेगाव शिवारात दि.१ मंगळवार रोजी उकडकीस आली. दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने आत्महत्या की घातपात ? अशी परीसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. सदरील घटनेचा पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.    शुभम कापसे(वय १७)रा.भाट आंतरवली व कावेरी खंदारे (वय १६)वर्ष रा.पाथरवाला खुर्द(ता.गेवराई) हल्ली मुक्काम माटेगाव येथे राहत होते. कावेरीला विवाहासाठी पाहुणे पाहण्यास येणार होते. तेव्हा पासून ती अस्वस्थ होती. दरम्यान शनिवार (दि.२९) ऑगस्ट रोजी पासून ते दोघेही घरातून बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु होता परंतु सदरील बेपत्ता दोघांचा मृतदेह मंगळवार रोजी विहिरीत तरंगताना दिसून आले. विहीर मालक सुधाकर चव्हाण यांनी याबाबत चकलांबा ठाण्यास माहिती दिली.माहिती कळताच चकलांबा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारोती मुंडे व पोलीस काॅन्सटेबल अमोल औसरमल यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थाच्या साह्याने मृतदेह विहीरीबाहेर काढून घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेहाचे उमापूर आरोग्य उपकेंद्रात शवविच्छेदन करून सदर मृतदेह नातेवाईकाच्या स्वाधीन केले आहेत. दोघांचे मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने आत्महत्या आहे की घातपात अशी परीसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे. सदरील घटनेचा पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!