मराठवाडा

शेतकर्‍यांना मोठा आधार , सिंचन विहिरींची मर्यादा वीसपर्यंत वाढविली


औरंगाबाद : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत घेण्यात येणार्‍या सिंचन विहिरींची मर्यादा 5 वरुन 20 पर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असल्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (म.ग्रा.रो.ह.यो.) एका ग्रामपंचायतमध्ये एका वेळी 5 सिंचन विहीरी मंजूर करता येतील अशी मर्यादा यापूर्वी घालून देण्यात आलेली होती. सिंचन विहिरींच्या कामांची शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे ही मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांकडून सातत्याने करण्यात येत होती. या मागणीचा विचार करून श्री.भुमरे यांनी पुढीलप्रमाणे ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सिंचन विहिरीची मर्यादा वाढवून देण्यास मंजुरी दिली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!