मुंबई

1 सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहणार; मुख्यमंत्री ठाकरे यांचे सूतोवाच

मुंबई, दि.25 (लोकाशा न्युज): जूनपासून देशात मिशन बिगीन अगेन’ सुरू झाले. देशातील काही राज्यांनी पटापट निर्णय घेऊन व्यवहार सुरळीत सुरू केले असले तरी महाराष्ट्र सरकार तशी घाई करणार नाही. त्यामुळे 1 सप्टेंबरनंतरही राज्यात लॉकडाऊन कायम राहील, असे सूतोवाच मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी केले.ठाण्यात कोरोनाबाबत केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी ठाकरे सोमवारी आले होते. महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार आदी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, जगभरातील काही देशांनीही काही गोष्टी घाईगडबडीने सुुरू केल्या. मात्र महाराष्ट्र अशी घाईगर्दी करणार नाही. कारण आपण ज्या गोष्टी सुरू केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन सुरू केल्या आहेत. पण, ज्या गोष्टी सध्या उघडणे शक्य नाही, किंवा त्या उघडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढेल, याची खात्री नाही त्या सुरू केल्या नसल्याचे ठाकरे म्हणाले.

शाळा-महाविद्यालयाबाबत संभ्रम कायम

1 सप्टेंबरपासून शाळा उघडण्याबाबतकेंद्र सरकारविचार करीत असले तरी राज्यातील शाळा इतक्यात उघडण्याची शक्यता नाही. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शिवाय, शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे करण्यात यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांनीकेंद्र सरकारपुढेठेवला आहे. 11 वी प्रवेशासाठी सगळीकडे झुंबड उडालेली असली तरी नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार याबाबत संभ्रम कायम आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!