बीड

गणेशोत्सव अन् मोहरमनिमित्त जिल्हा पोलिस प्रशासन तगडबंद

जिल्ह्यात सर्वत्र शांतता ठेवण्याचे खाकीचे आवाहन तर अफवा पसरविणार्‍यांवर 24 तास राहणार करडी नजरबीड : गणेशोत्सव आणि मोहरमला सुरूवात झाली आहे. त्याअनुषंगानेच जिल्हा पोलिस प्रशासन तगडबंद झाले आहे. कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आणि स्वाती भोर यांनी एक सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ठिकठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यादरम्यानच्या काळात जिल्हावासियांनी शांतता ठेवावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे शहरात सीसीटीव्ही तर अफवा पसरविणार्‍यांवर पोलिसांची 24 तास करडी नजर राहणार आहे.

पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांनी गणेशोत्सव व मोहरम बंदोबस्त निमीत्ताने जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला कडक व सात सूचना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. या काळात तणावपूर्ण वातावरण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठीच्या सक्त सूचना ठाणेदारांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात गणेशोत्सव व मोहरम निमीत्ताने राज्य राखीव पोलीस बल (एसआरपीएफ) जालना, यांच्याकडील 1 कंपनी उ प्लाटूनमध्ये विभागून 03 ठिकाणी असे 01 अधिकारी व 100 कर्मचारी तैणात करण्यात आले आहेत. तसेच 04 आरसीपी तुकड्या जिल्ह्यात 4 ठिकाणी तैणात करण्यात आल्या आहेत. जिल्लातील 28 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बंदोबस्ताकरिता 02 अपर पोलीस अधीक्षक, 05 पोलीस उप अधीक्षक, 23 पोलीस निरीक्षक, 61 सहाय्यक पोलीस निरीक्षक, 75 पोलीस उपनिरीक्षक, 2219 पोलीस कर्मचारी तर 700 होमगार्ड तैणात करण्यात आले आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 168 पोलीस अधिकारी, 2798 पोलीस कर्मचारी, आणि 700 होमगार्डंना गणशोत्सव व मोहरम बंदोबस्त संपूर्ण जिल्हाभर लावण्यात आला आहे. मा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस ठाणे प्रभारी यांना सूचना दिल्यानंतर पोलीस ठाणे प्रभारी यांनी शांतता कमिटी व गणेशोत्सव मंडळे यांच्या पोलीस स्टेशन स्तरावर बैठका घेवून महाराष्ट्र शासनाची कोविड -19 च्या अनुषंगाने गणेशोत्सवाबाबतची नियमावली समजावून सुचना देण्यात आल्या आहेत. अशा जिल्ह्यात 30 बैठका आयोजित करून नियमपूर्वक शांतता राखण्याच्या सूचना समाज बांधवांना दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात दि.17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहूल रेखावार आणि पोलीस अधीक्षक हर्ष पोदार यांनी जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळाचे सदस्य व अध्यक्ष यांच्यासह ठाणे प्रभार्‍यांची बैठक घेवून गणेशोत्सव नियमावलीच्या कडक अंमलबजावणी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. गणेशोत्सव व मोहरम अनुषंगाने जिल्ह्यात शांतता राखण्यासाटी 1391 वेगवेगळ्या प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहे. खोट्या बातम्या, अफवांचे ताबड़तोब खंडण करण्यासाठी पोलीस सर्तक आहेत. अफवा पसरवणार्‍यांवर बीड पोलीसांचा सोशल मिडीया सेल 24 तास करडी नजर ठेवून आहे. तसंच सर्व मुख्य शहर सीसीटीव्हच्या निगराणीखाली आहेत. तसेच संवेदनशिल गावांना, ठिकाणांना वेळोवेळी भेटी देवून सर्व पोलीस ठाणे स्तरावर दंगाकाबू पथकाच्या रंगीत तालमी घेण्यात येत आहेत, आज दि. 22 ऑगस्ट रोजी श्रीगणेशाची स्थापना होत असून 1 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी पर्यंत जिल्ह्यात गणेशात्सव साजरा करण्यात येत आहे.तसेच दि.21 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2020 या कालावधी दरम्यान मोहरम असल्याने यावर्षी कोव्हिड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये तसेच सर्व नागरिकांनी कोविड -19 च्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!