Uncategorized

आ. नमिता मुंदडांचा चौकार

झेडपीचे शिक्षक, स्त्री रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांचा पगार तात्काळ करा, शिक्षण मंत्री आणि आरोग्य मंत्र्यांना दिले पत्र तर पीक कर्जासाठी शेतकर्‍यांचे होणारे हाल आ. नमिता मुंदडांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारी मांडले


बीड : जनतेचे प्रश्‍न सोडविणार्‍या एक तत्पर आमदार म्हणून नमिता मुंदडांची ओळख बनली. यावेळी आ. नमिता मुंदडांनी जिल्हा परिषदेचे शिक्षक, लोखंडी सावरगाव (ता.अंबाजोगाई) येथील स्त्री रूग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या पगारावर आवाज उठविला आहे. या सर्वांना तात्काळ त्यांचे वेतन अदा करावे, अशा आशयाचे पत्र त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंना शुक्रवारी दिले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पीक कर्जासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना एक पत्र दिले आहे. जिल्ह्यातील बँकांना शेतकर्‍यांचे काहीच घेणे देणे नाही, त्यामुळे या प्रश्‍नाकडे तात्काळ लक्ष देवून नव्या-जुन्या शेतकर्‍यांचा पीक कर्जाचा प्रश्‍न तात्काळ सोडवावा, असे आ. मुंदडांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. बीड जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या जि.प. प्राथमिक/माध्यमिक शिक्षकांचा पगार बाराही महिने उशिरानेच होतात. गणेशोत्सव व मोहरम या सणानिमित्त ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन विशेष बाब म्हणून 25 ऑगस्ट 2020 पुर्वी अदा करण्याबाबत शिक्षण संचालक पुणे, यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. बीड जिल्हा परिषदेने अद्याप जुलै 2020 चेच वेतन जिल्हा परिषद शिक्षकांना अदा केलेले नाही. तरी राहिलेल्या वेतनासहित सणानिमित्त ऑगस्ट पेड इन सप्टेंबरचे वेतन अदा करावे व शिक्षकांना यापुढे प्रत्येक महिण्याला वेळेवर वेतन अदा करण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी आ. नमिता मुंदडांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. तसेच अंबाजोगाई येथील स्त्री रूग्णालय व वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रातील डॉक्टरांचा आणि कर्मचार्‍यांच्या रखडलेल्या वेतनाचा प्रश्‍न त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या कानावर घातला आहे. लोखंडीसावरगाव येथे स्त्री रूग्णालयात नऊ डॉक्टर, आठ परिचारिका, पाच तंत्रज्ञ तसेच मानसिक आजार केंद्रासाठी चौदा डॉक्टर व छत्तीस जणांचा स्टाफ आहे. यातील बराचसा स्टाफ अंदाजे एक वर्षापुर्वी भरलेला आहे. परंतू अद्यापही त्यांना त्यांचे वेतन मिळालेले नाही, तरी त्या सर्वांचे वेतन त्वरीत करावे अशी मागणी आ. मुंदडांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा कर्जाचा प्रश्‍न आ. मुंदडांनी जिल्हाधिकार्‍यांच्या दरबारी मांडला आहे. जिल्ह्यातील कर्जमाफी योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेने वाटप केलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी झालेली आहे. तेवढ्या शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँकेने अद्यापही पिक कर्ज वाटप केलेले नाही. किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळावी व किती शेतकर्‍यांना पिक कर्ज वाटप झाले याबाबत माहिती घेतली तर सत्यता समोर येईल. राष्ट्रीयकृत बँका पिक कर्ज वाटप करत नाहीत. नविन शेतकर्‍यांना तर पिक कर्ज वाटपाचा विषयच त्यांच्या समोर नाही. तरी पिक कर्ज माफी झालेल्या शेतकर्‍यांना त्वरित वाटप करावे, तसेच नविन पिक कर्ज मागणार्‍या शेतकर्‍यांनाही कर्ज देण्याच्या अनुषंगाने संबंधितांना आदेश द्यावेत अशी मागणी आ. मुंदडांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. केज मतदार संघातील केज तालुका, अंबाजोगाई तालुका व नेकनूर परिसरात असणार्‍या महाराष्ट्र ग्रामीण बँकांनी अद्यापही शेतकर्‍यांना नविन पिक कर्ज वाटप केले नसल्याचेही आ. मुंदडांनी म्हटले आहे. याही संदर्भात तात्काळ अ‍ॅक्शन घ्यावी, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!