बीड

गुंडांना एसपींचा आणखी एक दणका, जिल्ह्यातून दोन टोळ्या केल्या हद्दपार


बीड : गुंडगिरी करणार्‍यांना बीडचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी आणखी एक मोठा दणका दिला आहे. सातत्याने गुंडगिरी करणार्‍या दोन टोळ्यांना गुरूवारी जिल्ह्यातून एक वर्षाकरीता हद्दपार करण्यात आले आहे. या आदेशापुर्वी त्यांनी गेवराईतील एका वाळू माफियाला औरंगाबादच्या हर्सूल कारागृहात स्थानबध्द करून मोठा दणका दिला होता, या कारवाईनंतर अवघ्या काही तासांनीच त्यांनी बीड जिल्ह्यात गुंडगिरी करणार्‍या दोन टोळ्या जिल्ह्यातून हद्दपार केल्या आहेत. एसपींच्या या दोन्ही कारवयांचे जिल्हावासियांमधून स्वागत केले जात आहे.
बीड जिल्ह्यात आगामी गणेशोत्सव, मोहरम आणि इतर येणारे सण-उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी व समाजात शांतता नांदावी याकरिता जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी शर्र्तीचे प्रयत्न चालवले आहेत. बीड जिल्ह्यातील गुंडगिरीला आळा घालण्यासाठी तसेच त्या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून म.पो.का. 55, 56, 57 कायद्याअंतर्गत बर्‍याच गुन्हेगारांवर व गुंडांवर कार्यवाही करण्याचे योजले आहे. यापुर्वी पोलिस ठाणे गेवराई येथील म.पो.का. 55 प्रमाणे हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला होता. सदर प्रस्तावामधील तीन इसमांची टोळी असून त्यांची गावात व गेवराई तालुक्यात लोकांमध्ये दहशत असल्याने त्यांना एक वर्षासाठी बीड जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. तसेच पोलिस ठाणे अंबाजोगाई ग्रामीण येथील म.पो.का. 55 प्रमाणे एक हद्दपार प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यामधील दोन जणांची अंबाजोगाई तालुक्यात लोकांमध्ये दहशत असल्याने त्यांच्यापासून लोक प्रचंड त्रस्त होते. त्यांच्या वर्तणामुळे सार्वजनिक शांततेला धोका निर्माण झाला होता. समाजात शांतता रहावी व हद्दपार इसमांनी पुन्हा गुन्हे करू नयेत म्हणून त्यांच्या टोळीची पांगापाग करण्यासठी दोनी टोळीतील एकूण पाच जणांना पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी बीड जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. तसेच गणपती उत्सव काळात शांतता व सुव्यवस्था रहावी म्हणून जिल्ह्यातील गुन्हे अभिलेखावर असलेल्या आनखीण गुंड प्रवृत्तीच्या इसमांवर व गुन्हेगारांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियमाव्दारे बीड जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे प्रस्तावित आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!