देश विदेश

काश्मीरमधून १० हजार जवानांना तात्काळ हटवण्याचा मोदी सरकारचा आदेश

जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरमधून निमलष्करी दलाच्या १० हजार जवानांना माघारी बोलावण्याचा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. केंद्रशासित प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या एकूण १०० तुकड्यांना जम्मू काश्मीरमधून तात्काळ माघारी येण्याचा आदेश देण्यात आला आहे. या तुकड्यांना आपल्या तळावर परतण्यास सांगण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७० कलम हटवण्यात आल्यानंतर या जवानांना तैनात कऱण्यात आलं होतं. याआधी केंद्रीय गृहमंत्रालयाने याआधी मे महिन्यात केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या १० तुकड्या माघारी बोलवल्या होत्या. नव्याने तुकड्या माघारी बोलावल्यानंतर आता काश्मीर खोऱ्यात सीआरपीएफच्या ६० तुकड्या तैनात असतील. प्रत्येक तुकडीत १००० जवान असतील.  

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!