ही सगळी भन्नाट गोष्ट सुरू झाली एका इमेलमुळे. हा ईमेल आणि त्यापुढे घडत गेलेल्या घटना मी कधीच विसरू शकणार नाही. मे महिन्यात मला सीलँडचे राजकुमार मायकल यांचा आपण बोलू शकतो का असा संदेश मिळाला.या एका संदेशामुळे इतिहासाच्या आणि भूगोलाच्या एका वेगळ्याच विश्वात ओढला गेलो. स्वयंभू राजे, जमिनीवर अधिकार सांगणारे दावे, ऐतिहासिक विसंगती, दुसऱ्या महायुद्धातला ब्रिटन, पायरेट रेडिओ स्टेशन, कॉल पकडणे अशा वेगवेगळ्या गोष्टी त्यावेळेस मला करता आल्या.या इमेलमुळे तर मी एकदम रोमांचित झालो होतो. मला याआधी कधीही कोणत्याही राजकुमाराने इमेल पाठवलेला नव्हता आणि भविष्यातही असं होण्याची शक्यता नव्हती.सीलॅँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं.खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. 1942मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.हा किल्ला ब्रिटनच्या सीमेबाहेर होता. शस्त्रांनी सज्जही होता. युद्धकाळात इथं रॉयल नेव्हीचे 300 सैनिक तैनात होते. 1956मध्ये इथून नौदल पूर्णपणे हटवलं आणि हा किल्ला बेवारशासारखा एकाकी झाला.1966 पर्यंत हा किल्ला निर्जनच होता. मग एकेदिवशी ब्रिटिश फौजेतला एक निवृत्त मेजर इथं आला आणि त्यानं नव्या देशाची स्थापना केली.हा किल्ला किनाऱ्यापासून 12 किमी दूर आहे आणि नावेतून पाहाता येतो. दिसायला आजिबात खास वाटत नाही. दोन खांबांवर एखाद्या कंटेनरसारख्या इमारतीचं बांधकाम आहे.नावेतून तिथं गेलं की क्रेनने वर ओढावं लागतं. मगच वर जाता येतं. पण समुद्राचा भणाणता वारा आणि रौद्र लाटा मनात भीती निर्माण करतात.याच्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. त्याच्याशी अनेक कथा निगडित आहेत. हेलिकॉप्टरने घातलेला छापा, गँगस्टर्स, युरोपीय व्यापाऱ्यांनी ताबा घेण्याचा प्रयत्न अशा अनेक घडामोडी इथं घडल्यात.ब्रिटिश सरकारनं जी कागदपत्रं जाहीर केली आहेत त्यामध्ये या किल्ल्याला ‘इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरचा क्युबा’ म्हटलं आहे.याची एकेक माहिती ऐकायला सुरुवात केली की हॉलिवूडच्या एखाद्या पटकथालेखकानं पटकथा लिहिल्यासारखं वाटतं. एका कुटुंबानं या आऊटपोस्टला चिमुकल्या राष्ट्र बनवून टाकलं. हे पटतच नाही.तरीसुद्धा या एकाकी जागेमध्ये एका नव्या स्वप्न पाहिलं गेलं. कोणत्याही सरकारचा आपल्यावर अंमल नसून आपण स्वतंत्र आहोत असं घोषित करण्यात आलं. ब्रिटनच्या नाकावर टिच्चून इथे स्वतंत्र सरकार आहे.सीलँडच्या राजकुमार मायकल यांच्याशी फोनवर बोलणं झालं तेव्हा त्यांच्याकडे सुरस कथांचा खजिना असल्याचं मला जाणवलं.यातल्या काही गोष्टी त्यांनी ‘होल्डिंग द फोर्ट’ पुस्तकात छापल्या आहेत. परंतु सीलँडसंबंधी ज्या कथा जगाला माहिती नाहीत त्या कथा ते मला सांगायला तयार झाले होते.सीलॅँड हे चिमुकलं संस्थान इंग्लंडच्या सफॉक किनाऱ्याजवळ आहे. हा जगातला सर्वात लहान देश आहे असं म्हटलं जातं.खरंतर हा दुसऱ्या महायुद्धात अँटीएअरक्राफ्ट प्लॅटफॉर्म होता. 1942मध्ये तो तयार करण्यात आला होता आणि त्यावेळेस त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं एचएम फोर्ट रफ्स.
नागरिकत्वाची नागणी
सीलँडला नागरिकत्व मिळवण्यासाठी दररोज 100 इमेल्स येतात. दिल्लीपासून टोकियोपर्यंतचे लोक सीलँडशी प्रामाणिक राहाण्याची शपथ घ्यायला तयार आहेत.
मायकल म्हणतात, आमची एकूणच गोष्ट लोकांना असा विचार करायला भरीस घालते. जिथं लोकांना काय करा हे सांगितलं जातं अशा समाजात आम्हाला राहात नाही. सर्वजणांना सरकारपासून सूटका हवी आहे. जगाला आमच्यासारख्या प्रेरकशक्तींची गरज आहे. जगात अशा जागा फारच कमी आहेत.
सीलँड अजूनही त्याच जागेवर आहे आणि समुद्र गेली अनेक दशके याचं शांतपणे निरीक्षण करत आहे. ब्रिटनपासून जवळ असूनही जागा ब्रिटनपासून लांब आहे. हे किती वेगळं आणि अशक्यप्राय वाटतं ना?…
ब्रिटनशी भांडण
मायकल सांगतात, माझे वडील स्वतःचा देश तयार करावा अशा मताचे नव्हते. पण ब्रिटन सरकार आपलं रेडिओ स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात आहे हे पाहून ते त्रासले होते. आम्ही ब्रिटिश सरकारशी लढलो आणि जिंकलो. सीलँड आतापर्यंत स्वतंत्र अबाधित ठेवू शकलं आहे.
मान्यता मिळण्यासाठी नियम
लहान देशांना मान्यता देण्याचे नियम 1933 साली मॉंटेव्हीडिओ संमेलनात तयार करण्यात आले होते. त्यात अशा राज्यांचे अधिकार आणि कर्तव्यं निश्चित केली होती. अमेरिकेचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्टसह आंतरराष्ट्रीय नेत्यांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. याच संमेलनात राज्यासाठी चार मापदंड ठरवण्यात आले होते.लहान देशांना या मापदंडाच्या आधारावरच मान्यता मिळते असं डनफोर्ड सांगतात. राज्य (देश) म्हणवलं जाण्यासाठी लोकसंख्या, भौगोलिक क्षेत्र, सरकार आणि इतर देशांशी संबंध यांचा विचार केला जातो.चौथा आणि शेवटचा मापदंड लहान देशांना जास्त जेरीस आणतो कारण ते सतत आपल्याला मान्यता द्या यासाठी इथर देशांकडे भूणभूण लावत असतात. सीलँड मात्र असं करत नाही. ते स्वतःला सार्वभौम समजतात आणि त्यावर आपलाच हक्क असल्याचं समजतात.
प्रत्येक देशाच्या उत्पत्तीची, जन्माची एक कहाणी असते. सीलँडची कहाणी 1965 पासून सुरू होते. मायकल यांचे वडील पॅडी रॉय बेट्स ब्रिटिश सैन्यात मेजरपदावरुन निवृत्त झालेले होते. त्यानंतर त्यांनी मासेमारी सुरू केली होती. त्यांनी रेडियो इसेक्सची स्थापना केली होती.