बीड (प्रतिनिधी)
निरीक्षक, भरारी पथक राज्य उत्पादन शुल्क, बीड विभाग आणि दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांच्या पथकाने हाॅटेल मामा काठियाडवाडी धाबा मौजे मांजरसुंभा शिवारात (ता.जि.बीड) येथे संशयितरित्या उभ्या असलेल्या चार चाकी आयशर टेम्पोतून मद्य साठ्यासह एकूण दहा लाख वीस हजार सहाशे रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. होळी सणाच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्कने ही कारवाई केली.
मा.आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य, मुंबई.), डॉ.व्ही.एन.सूर्यवंशी (मा.संचालक, दक्षता व अंमलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क), सुनिल चव्हाण (मा.उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, छत्रपती संभाजीनगर.), पी.एच.पवार आणि मा.अधिक्षक गणेश बारगजे यांच्या मार्गदर्शनाखाली होळी सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यात सामुहिक विशेष मोहिमे अंतर्गत वाहन तपासणी चालू असताना बीड तालुक्यातील मौजे मांजरसुंभा शिवारात हाॅटेल मामा काठियाडवाडी धाबा येथे संशयितरित्या उभ्या असलेल्या चारचाकी आयशर टेम्पो (नोंदणी क्रमांक – एम.एच.21 / एक्स – 6113) हे वाहन तपासले असता सदरील वाहना मध्ये एड्रियल क्लासिक व्हिस्कीचे 750 मिली क्षमतेचे गोवा राज्यात विक्री करिता असलेले व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेले 45 बॉक्स (540 सिलबंद बॉटल) असा रूपये.3,45,600/- किंमतीचा मद्यसाठा व वाहन किंमत 6,75,000/- असा एकूण किंमत रूपये. 10,20,600/- मिळून आला. सदरील मुद्देमाल जागीच जप्त करण्यात आला. सदर वेळी आरोपीत इसम नामे राहूल रणजित जाधव हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला. सदरील कार्यवाही मध्ये आर.डब्लू.कडवे (निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक बीड.), व्ही.डी.आगळे (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक बीड.), ए.एस.नायबळ (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड.) व जवान सचिन सांगुळे, भागवत पाटील, राम गोनारे, नितीन मोरे, श्रीराम धस यांनी सहभाग घेतला होता. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास आर.डब्लू.कडवे (निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक, बीड) हे करीत आहेत. बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी अवैध हातभट्टी केंद्रांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने सातत्याने धाडी टाकण्यात येतात. या कारवाईत अवैध दारू विक्री, हातभट्टी केंद्रांवर, अवैध मद्यनिर्मिती, अवैध दारू वाहतुक तसेच अनेक ढाबे यावर वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तसेच अनेकांवर गुन्हे ही दाखल करण्यात आलेले आहेत. ज्ञात व अज्ञात आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा – 1949 अंतर्गत गुन्हे नोंदवले जात असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडाकेबाज कारवाईचे जनतेतून नेहमीच स्वागत झालेले आहे.
आवाहन :
नागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्या बाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नांव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारू विक्रेत्यावर ठोस कारवाई करण्यात येईल असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग, बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.
================
सोबत – बातमीचे फोटो.