बीड, राज्याच्या तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांना आज माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली,
माझ्या मनात कोणतीही खदखद नाही असे स्पष्ट शब्दात सांगत पंकजाताई मुंडे यांनी सद्या चालू असलेल्या चर्चेला विराम दिला आहे.
गेवराई येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतमताई मुंडे आले होते. त्यावेळी या संदर्भात माध्यमांनी पंकजाताई मुंडे यांना विचारणा केली . त्यावर पंकजाताई मुंडे म्हणाल्या आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिलं आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिलं हीच मोठी गोष्ट आहे, असं पंकजाताई मुंडे यांनी स्पष्ट केले.
पंकजाताई मुंडे म्हणाल्या की , मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते. पण कुणाच्याही सार्वजनिक आणि पक्षाच्याबाहेरच्या कार्यक्रमाला जाणं मला कंपल्सरी नाही, असं मुंडे म्हणाल्या.
तर बावनकुळे आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमचे मागच्या २२ वर्षापासून संबंध आहेत. त्यांच्या रक्तारक्तात भाजप आहे. या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजाताई यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्हं उभं करण्याचं काम काही लोक करत आहेत. पंकजाताई मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांचं नेतृत्व महाराष्ट्राने पाहिलं आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावं किंवा आपण साईडला व्हावं असं त्यांच्या मनात येत नाही. ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई यांनी मोठं काम केलं. त्या राष्ट्रीय सचिव म्हणून त्या काम करत आहेत. त्यांच्यावर मध्यप्रदेशची जबाबदारी आहे. त्यांचं नेतृत्व मोठं असल्याचे यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले.















