Uncategorized

परळीत शेतीच्या वादातून एकाचा खून, मयताची पत्नी व मुलगा जखमी

परळी ( प्रतिनिधी. )    शेतीच्या वादातून दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याचे वृत्त असून या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून मयताची पत्नी व मुलगा गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मारहाण करणारे घटना घडल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते.

    याबाबत अधिक माहिती अशी की परळी पासून जवळच असलेल्या दारावती तांडा येथे शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी झाल्याचे समजते. या हाणामारीत एकाचा जागीच मृत्यू झाला असून मयताची पत्नी व मुलगा ही गंभीर जखमी झाला आहे. त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उ

पचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

     दरम्यान या घटनेनंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुंडे घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर परळी शहरात कोणत्याही प्रकारचा तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी दवाखाना परिसर तसेच शहरात तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान वृत्त लिहीपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!