Uncategorized

वडवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन ठिकाणी एसपींच्या पथकाची छापेमारी

दिनांक 28 सप्टेंबर रोजी 14:45 वा पोलीस ठाणे वडवनी हद्दीत मोजे देववाडी शिवाजी चौकाचे बाजूला एक खुल्या पत्राच्या शेड समोर छापा मारला असता काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी तिरट नावाचा जुगार पत्त्यावर पैसे लावून हारजीतचा जुगार खेळत व खेळवीत असताना 7 इसम मिळून आले. त्यांच्याकडून नगदी रक्कम 21,130 रुपये तसेच तीन मोटरसायकल, पत्ते, व मोबाईल हँडसेट इत्यादी मिळून 1,77,630 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून
यातील आरोपी 1) भास्कर शिवाजी झाटे रा. देवडी तालुका वडवणी जि. बीड 2) सुरेश कडाजी खडूळ रा. मोरेवाडी ता. वडवणी जि. बीड 3) सोनाजी लक्ष्मण पुंडके रा.खळवट लिमगाव ता. वडवणी जि. बीड 4) उद्धव लक्ष्मण काकडे रा. वडवणी जि.बीड 5) रावसाहेब भाऊसाहेब सोळंके रा. खळवट लिमगाव ता.वडवणी जि. बीड 6) प्रकाश बळीराम आंबुरे रा.खळवट लिमगाव ता. वडवणी जि. बीड 7) बाळासाहेब महादेव गायकवाड रा.खळवट लिमगाव ता. वडवणी जि. बीड
त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसेच
दिनांक 28 सप्टेंबर रोजी 15:45 वा पोलीस ठाणे वडवनी हद्दीत बीड परळी रोडवर वडवणी येथे हॉटेल राज मटन खानावळच्या बाजूला छापा मारला असता काही इसम स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण मटक्याच्या आकड्यावर लोकांकडून पैसे लावून लावून हारजीतचा जुगार खेळत व खेळवीत असताना 4 इसम मिळून आले ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नगदी रक्कम 20,120 रुपये तसेच तीन व मोबाईल हँडसेट इत्यादी मिळून 47,120 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून
यामधील आरोपी 1) शिवाजी सुखदेव जाधव रा. बंगला चौक वडवणी ता. वडवणी जि. बीड 2) राहुल शिवाजी जाधव रा.बंगला चौक वडवणी ता. वडवणी जि.बीड 3) प्रल्हाद बाबुराव नागरगोजे रा.लोखंडी वस्ती वडवणी ता.वडवणी जि. बीड 4) शेख कलीम शेख सालर रा.पिंपरखेड ता. वडवणी जि.बीड सदर आरोपींना मटका बुक्की मालकाचे नाव गाव विचारले असता गणेश करकुटे असे सांगितल्याने नमूद 5 आरोपीतांविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर,अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक प्रमुख सपोनी विलास हजारे,पोलीस नाईक शिवदास घोलप पोलीस नाईक विकास काकडे, पोलीस अमलदार बालाजी बास्टेवाड,किशोर गोरे,विनायक कडू, चालक पोलिस अमलदार गणपत पवार यांनी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!