पुणे, दि. 24 : श्री. शिवाजीराव पंडित यांची नात आणि श्री. अमरसिंह पंडित यांची कन्या डॉ. पद्मंजली यांचा विवाह विधिवत पद्धतीने आज सकाळी ९.४५ वा. या शुभमुहूर्तावर पुणे तेथे संपन्न झाला.
यावेळी मा.खा. श्री. शरदचंद्र पवार, खा. सुप्रियाताई सुळे, ना. श्री. जयंत पाटील, ना. राजेश टोपे, ना. धनंजय मुंडे, ना. दत्ता भरणे, ना. नरहरी झिरवाळ, खा. रजनीताई पाटील, खा. प्रताप पाटील चिखलीकर, आमदार सर्वश्री प्रकाश दादा सोळुंके, सतीष चव्हाण, विक्रम काळे, बाळासाहेब आजबे, राहुल पाटील, संजय दौंड, निरंजन डावखरे, विनायक मेटे, रविंद्र फाटक, शामसुंदर शिंदे, दिलीपराव देशमुख, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती विश्वास जाधव, न्यायमूर्ती साधना जाधव, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, पोलिस उपायुक्त रामनाथ पोकळे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या विवाह सोहळ्यास दैनिक लोकाशा परिवारने शुभेच्छा दिल्या आहेत.















