Uncategorized

युवा वर्गाने अध्यात्माला दिलेली वेळ उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार – खा. प्रीतमताई, घाटशीळ पारगावमध्ये गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला झाली सुरूवात


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : वारकरी संप्रदायातील संत वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांनी सुरू केलेल्या गहिनीनाथ गडाच्या नारळी सप्ताहाला शनिवारी घाटशीळ पारगाव येथे सुरुवात झाली, यंदाच्या 90 व्या सप्ताहास जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनी उपस्थित राहून गडाचे महंत ह.भ.प विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेतले व उपस्थित भविकांशी संवाद साधला.
यावेळी डॉ. प्रीतमताई म्हणाल्या, की नारळी सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळाली, पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या प्रमाणात इथे येतात आणि या सप्ताहाच्या माध्यमातून आपले ज्ञान वाढवीत असतात, याठिकाणी असलेली युवा वर्गाची उपस्थिती लक्षणीय आणि मनस्वी आनंद देणारी आहे. अध्यात्मातून देशाचा सुवर्ण पाया मजबूत होतो आहे आणि युवा वर्गाने अध्यात्माला दिलेली वेळ उद्याच्या उज्वल भविष्याची नांदी ठरणार असल्याचे यावेळी खा. मुंडे म्हणाल्या.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!