बीड, दि. 25 : आज मा सहाय्यकपोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांना गुप्त बातमिदरा मार्फत बातमी मिळाली की मौजे नागेश वाडी तालुका पाटोदा जिल्हा बीड येथील इसम नामे आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे आपल्या स्वतःच्या फायद्याकरता केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो दूध त्याचे जवळील दुधामध्ये मिक्स करून दूध डेरी वर विक्री करण्यासाठी घेऊन जात आहे असे कळविले यावरून मा पंकज कुमावत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार व अन्न भेसळ अधिकारी यांनी सदर बातमीचे ठिकाणी जाऊन 0700 वाजता छापा मारला असता सदर ठिकाणी वरील इसम हा आपले राहते घरी केमिकल पावडर पासून दूध तयार करत असताना तयार केलेले 160 लिटर दूध व केमिकल पावडर व दूध तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 49 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अन्नभेसळ अधिकारी श्री गायकवाड साहेब यांच्या मदतीने जप्त करून पुढील कारवाई अन्न भेसळ अधिकारी श्री गायकवाड साहेब करत आहेत सदरची कारवाई सहाय्यक पोलिस अधिक्षक श्री पंकज कुमावत साहेब यांचे मार्गदर्शनाखाली बाबासाहेब बांगर बालाजी दराडे राजू वंजारे विकास चोपणे महिला पोलीस नाईक आशाताई चौरे व अन्न भेसळ अधिकारी गायकवाड कांबळे यांनी केली आहे.