Uncategorized

शनिवारी झेडपीच्या नव्या इमारतीचे होणार लोकार्पण, जि.प.अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट यांची माहिती


बीड, दि. 16 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा विविध कारणांनी अनेकदा लांबणीवर पडला होता. अखेर या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा मुहूर्त ठरला आहे. येत्या शनिवारी (दि.19) हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई शिवाजीराव सिरसाट यांनी दिली आहे.
जि.प.च्या या नव्या ईमारतीचे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री धनंजय मुंडे तर यावेळी राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे, खासदार रजनी पाटील, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, सीईओ अजित कुंभार यांच्यासह विधानसभेचे व विधान परिषदेचे सर्व सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, सर्व सभापतींच प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, सीईओ अजित पवार, अर्थ व बांधकाम सभापती जयसिंह सोळंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक 1 चे प्रभारी कार्यकारी अभियंता पोपटराव जोगदंड यांनी केले आहे. दरम्यान अध्यक्ष शिवकन्या सिरसाट आणि सभापती जयसिंह सोळंके यांच्या कार्यकाळात या ईमारतीचे लोकार्पण होत आहे, हा क्षण त्यांच्यासाठी सुवर्ण आक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!