Uncategorized

नांदेडपर्यंत पाठलाग करून पंकज कुमावतांनी 75 हजार लिटर बायो डिझेल पकडले, कारवाईत एक कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त, चार जणांना ठोकल्या बेड्या


केज, दि. 19 (लोकाशा न्यूज) : सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अवैद्य धंदे यांच्याविरुद्ध कारवाईचा सपाटा लावला असून तेहतीस लाख रुपयांच्या गुटख्यावर कार्यवाही होते ना होते तोच त्यांनी नांदेडपर्यंत जाऊन सुमारे एक कोटी रूपये पेक्षा जास्त रकमेचा बायोडिझेल ताब्यात घेतले आहे.

या बाबतची अधिक माहिती अशी की, 18 नोव्हेंबर रोजी पंकज कुमावत यांना एका गुप्त खबर्‍या मार्फत अशी माहिती मिळाली की, मुंबई व पुणे येथून बायोडिझेल घेऊन जाणारे चार टँकर हे केज मार्गे नांदेडकडे जात आहेत. ही माहिती मिळताच पंकज कुमावत यांनी दि. 18 नोव्हेंबर गुरुवार रोजी रात्री 9:30 मस्साजोग येथे सापळा लावला. त्या वेळी त्यांना एक टँकर आढळून आले. पंकज कुमावत यांनी टँकरचा पाठलाग करून त्यांनी टँकरच्या चालकाला ताब्यात घेतले. अधिक विचारपूस केली असता हे टँकर बायोडिझेल घेऊन नांदेड येथे घेऊन जात असल्याचे त्यांनी माहिती दिली. त्या नंतर पंकज कुमावत यांनी आपल्या पथकासह थेट नांदेड व लोहा गाठले. तेथे जाऊन त्यांनी नांदेड येथून व येथून (एमएच46/जे इ 1106), (एमएच-04/ जीएफ-9873), (एमएच-26/एच-8496) हे चार टँकर्स, एक स्कॉर्पिओ (एमएच-21/एएक्स-1356) , ह्युंदाई (एमएच-26/टी-9999) वेरणा या गाड्या ताब्यात घेतल्या. तीन टँकरमध्ये प्रत्येकी 25 हजार लिटर असे मिळून सुमारे 75 हजार लिटर्स डिझेल भरलेले आहे. एका ट्रकमध्ये एक लोखंडी टाकी व डिझेल काढण्यासाठीचे मोटर्स ठेवलेली आहे. सदर प्रकरणी चार आरोपींना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केजचे बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, विकास चोपणे, सचिन अहंकारे, महादेव सातपुते, राजू वंजारे, सुहास जाधव यांच्यासह परळी पोलीस स्टेशनचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, विष्णू फड आणि किशोर घटमल या पोलीस कर्मचारी पथकात सहभागी झाले होते. या कोटयावधी रुपयांच्या बायोडिझेल कार्यवाहीमुळे सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांचे राज्यात कौतुक होत असून गुन्हेगारी जगतावर दहशत निर्माण झाली आहे. एका ट्रकमध्ये लोखंडी टँक ठेवून त्याच्यामध्ये डिझेल उपसण्यासाठी लागणारी मोटार व इतर यंत्रणा होती. त्या ट्रकला ताडपत्री झाकून टाकल्यास त्यामुळे आतील टँकर दिसून येत नव्हते. मात्र पंकज कुमावत यांनी तपास काढला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!