
केज :- अवैद्य धंद्याचे कर्दनकाळ केज उपविभागाचे आयपीएस अधिकारी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केज तालुक्यातील नांदुर घाट येथे गुटखा माफिया यांच्या विरुद्ध कठोर कार्यवाही करीत लाखो रुपयांचा गुटखा ताब्यात घेतला आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १६ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५:०० वा च्या दरम्यान आयपीएस अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत हे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय केज येथे रुजू झाल्यापासून त्यांनी गुटका माफिया, वाळू माफिया व जुगार अड्डे यांच्यावर धाडी टाकून अवैद्य धंदे नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधलेला आहे. दि १६ नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी ५:०० च्या दरम्यान पंकज कुमावत यांनी केज पोलीस स्टेशन हद्दीतील नांदुर घाट येथे गुटखा माफिया विरुद्ध कार्यवाही करीत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा साठवून ठेवण्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या पथकाला सोबत घेत गुटखा साठा करून ठेवलेल्या ठिकाणावर धाड घालून लाखो रुपयाचा गुटखा ताब्यात घेतला. अद्याप या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून काही वेळात या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस कार्यवाही होणार असल्याची माहिती समजते.















