अंबाजोगाई, दि. 16 (लोकाशा न्यूज) : सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी मंगळवारी (दि. 16) आणखी दोन आरोपींना अटक केली असून त्यांना 19 नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सोमवारी याप्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
शहरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महीन्यात चारशे वेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून यातून ती पिडीता पाच महिन्यांची गर्भवती आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. हा तपास अतिरीक्त पोलीस अधीक्षक कवीता नेरकर यांच्याकडे सोपवण्यात आल्यानंतर सोमवारी चार आरोपींना अटक करण्यात आले तर मंगळवारी निलंबीत मुख्याध्यापकासह एका आंटीस पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमारे उभे केले असत दोघांनाही तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान पिडीतेवर अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी का सापडला नाही यामुळे न्यायालयाने तपासी अधीकार्यास जाब विचारला.















