Uncategorized

वारे टोपे अन् वारे परिक्षा’, पंधरा लाखावाल्यांना नोकर्‍या लागणार, अभ्यास करणारे मात्र भिकाला लागणार, ग्रुप डीचा पेपर आदल्या रात्री दोनलाच फुटला


बीड, दि. 31 (लोकाशा न्यूज) : भरती परिक्षा कोणत्याही विभागाची असो… त्या त्या भरती परिक्षेत मोठ्या प्रमाणात बोगसगिरी होतेच.. मागच्या सहा महिण्यांपुर्वी मोठा गाजावाजा करून राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरतीसाठी घोषणा केली, मात्र सुरूवातीपासूनच या भरती परिक्षेसाठी श्रीमंतांनी आपआपल्या परिने दांडके वशिले लावले, एका एका पदासाठी पाच लाखापासून 25 लाख रूपयांप्रयत्न रेट गेला. कालही आरोग्य विभागातील ग्रुप डीच्या झालेल्या परिक्षेदरम्यान अनेक गोंधळाचे प्रकार उघडकीस आले आहेत. कारण परिक्षेच्या आदल्या रात्री दोनलाच ग्रुप डीचच्या परिक्षेचा पेपर धनदांडग्या उमेदवारांच्या हाती पडला. ज्यांनी ज्यांनी पंधरा लाख रूपये दिले त्यांची नौकरी फिक्स झाली असल्याचे आता सांगितले जात आहे. गरिबांचे लेकरं मात्र भिकाला लागणार आहेत. यावरूनच ‘वारे टोपे अन् वारे परिक्षा’ अशीच चर्चा आता रंगू लागली आहे.
रविवारी (ता.31 ऑक्टोंबर) आरोग्य विभागातील ग्रुप डीमधील पदांसाठी संपूर्ण राज्यभरात परिक्षा घेण्यात आली. बीड जिल्ह्यात ही परिक्ष  77 केंद्रांवर पार पडली, जिल्ह्यातून या परिक्षेसाठी 22205 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, प्रत्यक्षात मात्र 15500 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यापैकी 33 केंद्रावर 7179 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. ‘वरून सगळं चांगलं दिसत असलं तरी पडद्यामागे मात्र ग्रुप डीच्या या पदांसाठी मोठी डिल झालेली आहे. त्यामुळेच या परिक्षेचा पेपर आदल्या रात्री दोनलाच अनेकांच्या हाती पडला, परिणामी संबंधित उमेदवारांनी अगदी काही मिनीटातच या पेपरची प्रश्‍न पत्रिका सोडविली, आदल्या रात्री पेपर ज्यांच्या हाती पडला त्यांची नौकरी फिक्स असल्याचे समोर येत आहे. कारण धनदांडग्या उमेदवारांनी याच परिक्षेसाठी पाच लाखापासून 25 लाख रूपयांपर्यंत रक्कम मोजली असल्याचेही समोर येत आहे. आरोग्य विभागाच्या या भरतीमधील अशा प्रकारामुळेच गरिबांच्या लेकरांचे भविष्य मात्र अंधारात जाणार आहे. यामुळेच ‘वारे टोपे अन् वारे परिक्षा’ अशीही चर्चा आता सर्वत्र होवू लागली आहे.

परिक्षेच्या डीलमध्ये अधिकार्‍यांपासून
नेत्यांचाही सहभाग
या परिक्षेसाठी बीडसह संपूर्ण राज्यात मोठी डिल झालेली आहे. या डीलमागे अनेक अधिकारी आणि अनेक नेत्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचेही समोर येत आहे. कारण स्वत:चे खिसे भरण्यासाठीच अधिकारी आणि नेते गोरगरिब लेकरांचे भविष्य अंधारात घालून धनदांडग्यांच्या लेकरांना या भरतीमध्ये समावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

टोपे, साहेब बारकाईने चौकशी
करून कारवाई करा
माझं अन् तुझं करण्यापेक्षा ज्या लेकरांनी खर्‍या अर्थाने अभ्यास करून परिक्षा दिली त्यांना न्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळेच टोपे साहेब या प्रकरणाची बारकाईने सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी बीडसह संपूर्ण महाराष्ट्रातून होवू लागली आहे.

तिघांवर गुन्हे दाखल करून केले अटक
या परिक्षेदरम्यान काही जणांकडे संशयीत इलेक्ट्रॉनिक उपकरण आढळून आली. अंबाजोगाई येथील वेणूताई चव्हाण हायस्कुलमधील एक व योगेश्‍वरी विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांवर थेट गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. सचिन हिरालाल गोमलाडू, विक्रम जाऊसिंग बाहुरे आणि झनकसिंग शिवसिंग सिसोदे असे या गुन्ह्यातील आरोपींची नावे आहेत. 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!