Uncategorized

सौ.रूक्‍मीनबाई शेटे यांचे निधन


बीड/ प्रतिनिधी : शहरातील सराफ रोड भागातील रहिवाशी रूक्‍मीनबाई वसंतआप्पा शेटे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक 19 रोजी पहाटे निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 68 वर्षे होते.
शहरातील सराफा रोड भागातील व्यापारी वसंतआप्पा शेटे यांच्या पत्नी रुक्मिणीबाई वसंतआप्पा शेटे या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या मंगळवारी पहाटे यांचे निधन झाले त्या अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीत समाधी सोहळा पार पडला. यावेळी सर्वस्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पती वसंतआप्पा शेटे, गणेश, महेश, रमेश हे तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!