बीड/प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे आहेर वडगाव येथे आई तुळजाभवानी मंदिरात मोठ्या प्रमाणात यात्रा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो मात्र कोरोना च्या पार्श्वभूमीवर मोठ्या यात्रावर शासनाने बंदी घातली आहे असे असले तरी यावर्षी भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहे यंदा कोजागिरी पौर्णिमे निमित्त आयोजित करण्यात आलेली यात्रा रद्द करण्यात आल्याचे मंदिराचे विश्वस्त विजयकुमार देशपांडे यांनी सांगितले आहे
बीड पासुन जवळच असलेल्या आहेर वडगाव येथील तुळजाभवानी मातेचे मंदिर प्रसिद्ध आहे या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे या ठिकाणी होणारी यात्रा रद्द करण्यात आले आहे यावर्षी शासनाचे नियम पाळून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले आहेत दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आहेर वडगाव येथील यात्रा रद्द करण्यात आली असून शासनाचे नियम पाळून भाविकांनी केवळ दर्शनाचा लाभ घ्यावा मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारचे स्टॉल दुकानात किंवा गर्दी होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये असे आव्हान मंदिराचे विश्वस्त विजयकुमार देशपांडे यांनी सांगितले आहे















