Uncategorized परळी

लोकनेत्याच्या आठवणींना सर्व सामान्यांमधून मिळाला उजाळा, अन् पंकजाताई मुंडे यांनी नागरिक, कार्यकर्त्यांसमवेत घेतला चहाचा आस्वाद..!

परळी ।दिनांक २७।
लोकनेते मुंडे साहेब अंबेवेस भागातील ज्या हाॅटेलमध्ये चहा घ्यायचे आज त्याच हाॅटेल मध्ये जाऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी सर्व सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांसमवेत चहाचा आस्वाद घेतला, यावेळी उपस्थितांनी मुंडे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

पंकजाताई मुंडे आज सकाळपासुन शहरात विविध भागात सांत्वनपर भेटी देत होत्या. अंबेवेस भागात आल्यानंतर त्या अचानक थेट प्रकाश खोत यांच्या म्हाळसाकांत हाॅटेलमध्ये गेल्या. खोत यांचे वडिल लोकनेते मुंडे साहेबांचे पूर्वीपासूनचे सहकारी होते. मुंडे साहेब नेहमी या हाॅटेलमध्ये चहा घेण्यासाठी यायचे. आज त्याच हाॅटेलमध्ये पंकजाताई आल्याचे पाहताच खोत यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. पंकजाताईंनी त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तसेच त्यांनी तयार केलेला चहा देखील घेतला. यावेळी या भागातील बरेचसे सर्व सामान्य नागरिक देखील उपस्थित होते, त्यांच्यासमवेत चहाचा आस्वाद घेतांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, प्रकाश जोशी, अनिल तांदळे, नगरसेवक पवन मुंडे, महादेव इटके, नरेश पिंपळे, नितीन समशेट्टी, पवन मोदाणी, मोहन जोशी, विकास हालगे, सुशील हरंगुळे आदी यावेळी उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!