अंबाजोगाई: तालुक्यातील सेलू अंबा टोलनाक्यावर टोल भरण्यावरून लोखंडी गजाने डोके फोडल्याची घटना मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजताचा दरम्यान घडली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दखल झाला आहे.
तालुक्यातील सेलू अंबा येथील टोल नाक्यावर आरोपितांनी गैर कायद्याची मंडळी जमवून टोल नाका येथे टोल चे पैसे भरण्याच्या कारणावरुन कैलास काळे आणि त्याच्या सोबतच्या साक्षीदाराणा शिविगाळ करून लथाबुक्यांनी व विटाने मारहाण करून मुक्काम मार दिला. कृष्णा देशमुख याने कैलास च्या डोक्यात लोखंडी गजाने मारून डोके फोडून जखमी करून जीवे मारण्याची धमक्या दिल्याचा कारणावरुन कैलास काळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात कृष्णा देशमुख (रा. माकेगाव), शंकर सांगापुडे, अतुल गोरडे, रवि भाडके, सचीन राठोड, माऊली औताडे, आकाश देशमुख, अशोक देशमुख (सर्व रा. सेलू अंबा) यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 275/2021 कलम 147, 148,
149, 324, 323, 504, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास साहायक पोलिस निरीक्षक सावंत करत आहेत.