अंबाजोगाई

सीईओंनी अंबाजोगाई पंचायत समितीला दिलेल्या अचाणक भेटीने अधिकारी-कर्मचार्‍यांची उडाली भंबेरी, खोटी माहिती दिली तर जागच्या जागीच कारवाई करणार – अजित पवार


अंबाजोगाई, दि. 2 (लोकाशा न्यूज) : सीईओ अजित कुंभार यांनी गुरूवारी अंबाजोगाई येथील पंचायत समितीला अचाणक भेट दिली. या भेटीमुळे समितीमधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली होती. खोटी माहिती दिली तर जागच्या जागी कारवाई केली जाईल, असा दमच यावेळी सीईओ अजित पवार यांनी त्या ठिकाणच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांना भरला आहे.
एका कार्यक्रमानिमित्त सीईओ अजित पवार हे गुरूवारी अंबाजोगाईला गेले होते, यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेच्या ग्राम पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी यांचीही उपस्थिती होती. गुरूवारच्या या दौर्‍यात त्यांनी अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या घनवनाची पाहणी केली, तसेच लोखंडी सावरगावच्या डीसीएचलाही भेट देवून रूग्णांची चर्चा केली. या दौर्‍यातच त्यांनी अंबाजोगाईच्या पंचायत समितीला अचाणक भेट दिली. यावेळी त्यांनी पंचायत समितीमधील सर्व विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. यापुढे सर्व माहिती अपडेट ठेवा, अचाणक कुठल्याही गावांना भेटी देवून सत्यता पडताळणी करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले, विशेष म्हणजे यावेळी खोटे कोणी सांगितले तर त्यांच्यावर जागच्या जागीच कडक कारवाई केली जाईल, असा दमही यावेळी सीईओंनी भरला आहे. त्यांनी यावेळी दिलेल्या अचाणक भेटीमुळे अंबाजोगाई पंचायत समितीमधील अधिकारी आणि कर्मचार्‍यांची चांगलीच भंबेरी उडाली होती.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!