देश विदेश

लोकसभेत गोंधळ घालणारे 10 खासदार निलंबित


नवी दिल्ली, दि. 28 (लोकाशा न्यूज) : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळ घातल्याप्रकरणी 10 खासदारांना (10 चझी) निलंबित करण्यात आलं आहे. या खासदारांना कार्यकाल संपेपर्यंत निलंबित राहावं लागण्याची शक्यता आहे. लोकसभेचं कामकाज सुरू असताना गोंधळ घालणे, घोषणाबाजी करणे आणि कागद फेकणे या कारणांसाठी दहा खासदारांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा अध्यक्षांचा अवमान केल्याप्रकरणी 10 खासदारांचं निलंबन झालं आहे. हे सर्व खासदार लोकसभा अध्यक्षांसमोर येऊन त्यांच्यावर कागद फेकत होते. निलंबित खासदारांमध्ये मणिकम टागोर, दिन कुरिकोसे, हेबी एडन, एस. ज्योतिमणी, रौनित बिट्टू, गुरजित औजला, टीएन प्रथपन, व्ही. वैथिलिंगम, सप्तगिरी शंकर आणि दीपक बाज यांचा निलंबित खासदारांमध्ये समावेश आहे. या निलंबनानंतर लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. या खासदारांनी लोकशाहीचा अपमान केला असून यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याचा आरोप भाजपने मंगळवारी केला होता. या खासदारांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली होती. लोकसभेत गोंधळ घालण्याच्या या प्रकारामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कमालीचे संतप्त असल्याचं सांगितलं जात आहे. अशा प्रकारे एखादा खासदार जर दुसर्‍यांदा गोंधळ घालताना दिसला तर त्याला पूर्ण टर्मसाठी निलंबित करण्यात यावं, असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकसभा आणि राज्यसभेत देशासाठी महत्त्वाच्या विषयांवर बोलूच दिलं जात नसेल, तर विरोधक घोषणाबाजी करणारच, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. पेगॅसिस प्रकरणी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावं, एवढीच आमची मागणी आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणं हे विरोधी पक्षांचं कर्तव्यच आहे, असंही ते म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!