आष्टी

अंभोरा फाट्याजवळ घाटात ट्रॅव्हल्स कठड्याला धडकली,रस्त्याच्या कठड्याने प्रवासी बालंबाल बचावले

कडा / वार्ताहर

परळीहून पुण्याकडे जाणारी खाजगी ट्रॅव्हल्स अंभोरा फाट्याजवळ घाटात कठड्याला धडकली,या अपघातात खाजगी बस कठड्याला धडकल्यामुळे अनेक प्रवासी बालंबाल बचावले आहेत.

परळीहून पुण्याकडे परळी येथील मंगलमूर्ती खाजगी ट्रॅव्हल्सची बस क्रमांक (AR01J3227) रात्री उशिरा चालली होती. आष्टी तालुक्यातील अंभोरा फाट्याजवळ आठवडच्या घाटात वळणावर बस चालकाला टर्न न बसल्यामुळे गाडी कठड्याला धडकली आहे. या अपघातामध्ये गाडीचे नुकसान झाले, मात्र अनेक प्रवासी बालंबाल बचावले आहेत. यापूर्वी याच ठिकाणी मालवाहू ट्रक धडकून खाली खड्ड्यात कोसळला होता.
—–%%——

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!