देश विदेश

धर्मांतरण प्रकरणातील आरोपी इरफान निघाला सिरसळ्यातील


दिल्ली, उत्तर प्रदेशमधील तब्बल 3 हजार मूकबधीर विद्यार्थ्यांचे धर्मांतर केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे . या प्रकरणाचा तपास तिथल्या दहशतवादविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला होता . या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून दोघांना अटक केली होती . आता या प्रकरणाचे बीड कनेक्शनही उघडकीस आले आहे . या प्रकरणी पोलिसांनी मूळच्या बीड जिल्ह्यातील शिरसाळा इथला रहिवासी असलेल्या इरफान खान नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे . इरफान खान हा केंद्र सरकारच्या महिला आणि बाल कल्याण विभागात नोकरी करत असल्याचे सांगण्यात येत आहे . दहशतवादी कारवायांत यापूर्वीही बीड कनेक्शन समोर आले होते . आता बळजबरीने धर्मांतर केल्याच्या प्रकरणाचे कनेक्शनही बीडपर्यंत पोहोचले आहे .
हिंदू धर्मातील गरीबांना धर्मांतरासाठी बळजबरी करणाऱ्या रॅकेटचा उत्तर प्रदेश एटीएसने पर्दाफाश केला आहे . या प्रकरणात 21 जून रोजी मौलाना जहांगीर आणि उमर गौतम या दोघा मौलानांना अटक केली . त्यांना पाकिस्तानची ‘ आयएसआय ‘ ही गुप्तचर यंत्रणा आणि विदेशातील आणखी एक मुस्लिम संघटना पैसे पुरवत होती . त्यांनी आतापर्यंत 1 हजार हिंदूंचे धर्मांतर केले असून त्यात मूकबधिर मुले आणि महिलांचे प्रमाण अधिक आहे . रॅकेटमध्ये 100 हून अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे . धर्मांतराच्या रॅकेटने नोएडा डेफ सोसायटीच्या मूकबधिर शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनींचे जबरदस्तीने धर्मांतर केले . मागील दोन वर्षांपासून कानपूर , बनारस आणि नोएडामध्ये धर्मांतरासाठी सक्ती करण्याचे प्रकार सुरू आहेत . धर्मांतर केलेल्या एक हजार महिला व मूकबधिर मुलांच्या नावांची यादी एटीएसच्या हाती लागली आहे . रॅकेटने कानपूरच्या एका मुलाला दक्षिणेकडील शहरात नेले . एटीएसकडून त्या मुलाचा शोध घेतला जात आहे . उत्तर प्रदेशमध्ये बळजबरीने धर्मांतर केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे .

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे . तसेच , धर्मांतर प्रकरणात दोषी आढळल्यास रासुका ( राष्ट्रीय सुरक्षा कायदा ) लावून संपत्ती जप्त करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत . उत्तर प्रदेश अँटी टेरेरिस्ट स्क्वॉडने ( एटीएस ) 21 जून रोजी दोन मौलाना , जहांगीर आणि उमर गौतमला लखनौमधील एका मोठय़ा मुस्लिम संस्थेतून ताब्यात घेतले होते . त्यांच्यावर बळजबरीने हिंदूंचे धर्मांतर केल्याचा आरोप आहे . एटीएसची टीम सुमारे चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करत होती . पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय त्यांना फंडिंग करत होती . कोण आहे इरफान खान या धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी इरफान खान याला दिल्लीतून अटक केली आहे .

धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी इरफान खान याला दिल्लीतून अटक केली आहे . दिल्लीतून अटक करण्यात आलेला इरफान खान हा बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथील रहिवासी आहे . अटक केलेला इरफान खान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणचा आहे . शिरसाळा येथे त्याचं प्राथमिक शिक्षण झालं असून तो सध्या दिल्लीला वास्तव्याला आहे . दिल्लीतील महिला व बाल विकास मंत्रालयात तो इंटरप्रीटेटर म्हणून कामाला आहे . या प्रकरणात इरफानचे नाव आल्याने त्याच्या कुटूंबाला धक्का बसला असून त्यांनी इरफानवर लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे .

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!