आष्टी

वनरक्षक अनिल जगताप यांची गळफास घेऊन आत्महत्या

कडा / वार्ताहर

येथील वनविभागात वनरक्षक पदावर कार्यरत असलेले बत्तीस वर्षीय अनिल बाबासाहेब जगताप यांनी श्रुंगेरीदेवी मंदीर परिसरात वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना शनिवारी निदर्शनास आली आहे.
आष्टी येथील वनविभागात ब्रम्हगाव कार्यक्षेत्रात दिवंगत अनिल जगताप हे वनरक्षक म्हणून कार्यरत होते. शनिवारी दिवसभर फोन लागत नसल्यामुळे त्यांचा परिसरात शोध घेण्यात आला असता, श्रुंगेरीदेवी मंदिराच्या परिसरात एका वडाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. याबाबत आष्टी पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या पश्चात आईवडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!