बीड

सरपंच आरक्षण सोडतचा मुहूर्त ठरला; या तारखेला होणार सोडत

बीड,दि.29(लोकाशा न्युज)ः प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेले सरपंच पदाचे आरक्षण शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आले होते. हे आरक्षण रद्द केल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत दि.4 व 5 फेबु्रवारी रोजी दुपारी 1 वा. तालुका स्तरावरील तहसिल कार्यालयात होणार आहे.
डिसेंबरमध्ये जिल्ह्यातील 1 हजार 31 ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र ग्रामविकास विभागाकडून सदरील आरक्षण रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण रद्द करण्यात आले होते. ग्रामविकास विभागाच्या निर्णयाप्रमाणे ग्राम पंचायत सदस्य निवडणुकीनंतर जिल्ह्यातील 1 हजार 31 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा नव्याने सोडण्यात येणार आहे. दि.4 फेबु्रवारी रोजी बीड, गेवराई, शिरुर, पाटोदा, आष्टी, माजलगाव, वडवणी, धारुर, अंबाजोगाई व केज या तालुक्यातील आरक्षण सोडत तर दि.5 फेबु्वारी रोजी परळी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे. तहसिलदार यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी जगताप यांनी 11 तालुक्यांच्या तहसिलदारांना आदेशित केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!