बीड

चार नगरसेवकांची राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी

बीड-बीड मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांना शिवसेनेने मोठा धक्का दिला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक शुक्रवारी (दि.२९) शिवसेनेत दाखल झाल्याने आ.क्षीरसागरांना मोठा धक्का बसला आहे.
बीड नगरपालिकेतील रणजित बनसोडे सीता भैय्यासाहेब मोरे ,गणेश तांदळे यांच्या मातोश्री कांताबाई बन्सीधर तांदळे आणि प्रभाकर पोकळे यांनी नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने आ.क्षीरसागरांना मोठा धक्का बसला आहे.अलीकडे काळाच्या बीड शहरातील राष्ट्रवादीला अनेक जण सोडचिट्टी देत असल्याने आ.क्षीरसागर अडचणीत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.विधान सभा निवडणुकीतील प्रमुख शिलेदार आ.क्षीरसागरांची साथ सोडू लागल्याने राष्ट्रवादीसाठी ही चिंतेची बाब ठरू लागली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!