नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन गेल्या 60 दिवसांपासून दिल्ली सीमेवर सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकर्यांनी 26 जानेवारीला म्हणजेच ’प्रजासत्ताक दिनी’ ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांकडून ट्रॅक्टर रॅलीसाठी परवानगी मिळाल्यानंतर आता दिल्ली सीमेवर आंदोलन करणारे क्रांतिकारक शेतकरी संघटनेचे नेते दर्शन पाल यांनी सोमवारी सांगितले की, 1 फेब्रुवारीला शेतकर्यांकडून संसदेवर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, बजेट सत्राचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान चालणार असून 1 फेब्रुवारीला केंद्र सरकार आपले बजेट सादर करणार आहे.