बीड

राष्ट्रवादीची अशीही बनवाबनवी ; भाजपच्या ‘त्या’ सदस्यांनी प्रवेश केल्याचा खोटारडेपणा उघड,परळी पंचायत समितीतील ‘ते’ सदस्य भाजपमध्येच ; पंकजाताई मुंडे यांच्यावर केला विश्वास व्यक्त

परळी दि. ०७ ——- परळी पंचायत समिती मधील भाजपच्या सदस्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नाही, ते भाजपमध्येच आहेत. असे असताना त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या माध्यमांना देऊन राष्ट्रवादी काँग्रेसने बनवाबनवी केल्याचे उघड झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर आज अविश्वास ठराव आणला. हा ठराव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी खोटे बोलून भाजपच्या तीन सदस्यांना पळवले होते. आज त्यांच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले. वास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे असतांना राष्ट्रवादीने माध्यमांची दिशाभूल करून त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या दिल्या आहेत. भाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी भाजप नेत्या पंकजाताई मुंडे यांच्यावर विश्वास व्यक्त केला असून आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे म्हटले आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!