बीड दि.27 : शहरातील बसस्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एका पोलीस कर्मचार्यास सात हजाराची लाच घेतांना रंगेहाथ पकडले. रविवारी (दि.27) दुपारच्या सुमारास बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.
चरणसिंग वळवी असे पोलीस कर्मचार्याचे नाव आहे. वळवी हे शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नियुक्ती आहे. तक्रार अर्जात कारवाई न करण्यासाठी तक्रारदाराकडे सात हजार रुपय लाचेची मागणी केली होती. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत बस स्थानकातील पोलीस चौकीमध्ये सात हजाराची लाच घेतांना वळवी यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल खाडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार, उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.रव्रिंद पाडावी, पोना.श्रीराम गिराम, गोरे, पोशि.गारदे, कोरडे यांनी केली. या कारवाईने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.















