बीड

सराईत चोरट्यास बेड्या ठोकल्या, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; चोरीचे सात मोबाईल जप्त


बीड, दि. 1 : विविध जिल्ह्यात मोबाईल चोरी आणि घरफोडी करणार्‍या सराईत चोरट्यास बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीड शहरात सापळा लावून पकडले. बुधवारी (दि.30) रात्री हा चोरटा चोरीचे मोबाईल विकण्यासाठी निघाला असता तो पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

सय्यद मोहसीन सय्यद जाफर (रा. हुसेनिया कॉलनी, बीड) असे त्या चोरट्याचे नाव आहे. बुधवारी रात्री 11 वाजता तो चोरीचे मोबाईल विकण्यासाठी बीड शहरातील तेलगाव नाका येथे येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे तेलगाव परिसरात सापळा लावून पोलिसांनी त्याला जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून 54 हजार 500 रुपये किमतीचे चोरीचे सात मोबाईल जप्त करण्यात आले. हे मोबाईल त्याने नाशिक येथील घरफोडीत चोरल्याचे चौकशीत उघड झाले. मोहसीन याचा आष्टी पोलीस ठाण्यात दाखल चोरीच्या विविध गुन्ह्यात समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासात त्याच्याकडून इतर आणखी घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक राजा रामा स्वामी, स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक भारत राउत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंद कांगुणे, भारत मोरे, पोलीस कर्मचारी उबाळे, शेख, खेडकर, ठोंबरे, दुबाले, कदम, तांदळे, गायकवाड, वंजारे यांनी पार पाडली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!