नवी दिल्ली | भाजपचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर जे. पी. नड्डा यांनी पक्षाची नवी टीम तयार केली आहे. या नव्या धुरिणांमध्ये महाराष्ट्रातल्या दोन मोठ्या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत.भाजपच्या कार्यकारिणीची घोषणा नड्डा यांनी केली आहे. या नव्या कार्यकारिणीत पंकजाताईंवर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोअर कमिटीमधील स्थान कायम ठेवून पंकजाताईंवर राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते, त्यानुसार त्यांच्यावर bjp च्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, विनोद तावडेंनाही तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. एकूण १३ जणांना National Secretary म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रालते ४ नेते आहेत. पंकजाताई मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावे या यादीत आहेत.याशिवाय राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेतेम म्हणून जमाल सिद्दीकी यांचं नाव आहे.