देश विदेश

भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा

भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा

नवी दिल्ली 20 सप्टेंबर: भारत आणि चीनमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. शांतता राखण्याचं ठरल्यानंतरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. त्यामुळे भारतीय लष्कर सावध असून त्यांनी चिनी लष्कराला मोठा दणका दिला. भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे.

या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर-4 जवळची आणखी एक टेकडी अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचं वर्चस्व आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे जाऊ शकते असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

चीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला

काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघडकीस आली होती. चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!