देश विदेश

येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शाळा सुरू होणार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी


school will be open for class 9th to class 12th central govt releases sop
Photo- ANI

मुंबई : इयत्ता 9 ते 12 वी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शाळा 21 सप्टेंबरपासून सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची परवानगी मिळाली आहे. स्वेच्छेने व पालकांच्या संमतीने शिक्षकांच्या मार्गदर्शनखाली विद्यार्थी शाळेत येतील. केंद्रीय आरोग्य मंत्रालयालाकडून याबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत.

येत्या 21 सप्टेंबरपासून इयत्ता 9 ते 12 वी वर्गसाठी शाळा सुरू करण्यास केंद्राकडून परवानगी मिळाली असून त्यासाठी काटेकोर पणे गाईडलाईन्सचे पालन करणे सुद्धा गरजेचं आहे. पालकांच्या संमतीनेचा विद्यार्थी शाळेत येतील. शिवाय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शाळा सुरू करण्यास परवानगी असेल. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक आजारी असल्यास त्याने शाळेत येऊ नये. शाळेत एक वेगळा आयसोलेशन रुमही बनवला गेला पाहिजे. जेणेकरुन जर कोणी आजारी असेल तर तो आरोग्य सुविधा येईपर्यंत त्या खोलीत राहू शकेल. जर एखादा विद्यार्थी आजारी पडला तर त्याला पालकांसह स्थानिक आरोग्य यंत्रणेस माहिती द्यावी लागेल.

शाळा सुरू करताना विद्यार्थी, शिक्षक हा कोणत्याही लक्षण नसलेला व्यक्तीला शाळेत येण्यास परवानगी असणार आहे. मास्क, सॅनिटायजरचा वापर शाळेत वेळोवेळी खबरदारी म्हणून केला जाणार आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाण्यासाठी 6 फूट अंतर राखावे. यासाठी वर्ग खोलीत सुद्धा त्यानुसार आसनव्यवस्था करण्यात यावी, अशी नियमावली केंद्र सरकारने जारी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!