Uncategorized

बीडमध्ये प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र काढून देणारी टोळी सक्रीय?बीडच्या दोघांनी बोगस प्रमाणपत्रावर नांदेडमध्ये मिळवली पोलिसाची नोकरी,दोघांवरही गुन्हा दाखल

बीड, दि. 9 (लोकाशा न्यूज) : प्रकल्पग्रस्ताचे बोगस प्रमाणपत्र काढून देणारी टोळी बीड जिल्ह्यामध्ये सक्रिय आहे. या टोळीने आतापर्यंत अनेकांना बोगसप्रमाणपत्र काढून दिले. या बोगस प्रमाणपत्रावर कित्येकांना नोकर्‍या सुद्धा लागलेल्या आहेत. 2021 च्या पोलीस भरतीत बीडच्या दोघांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर करून भरतीचा लाभ घेतला. या दोघांच्या प्रमाणपत्राची चौकशी केली असता हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोघांविरोधात नांदेड येथील वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या दोघांना बोगस प्रमाणपत्र देणारा तो एजंट कोण? याचा तपास आता पोलीस घेऊ शकतात. या कारवाईने बीड जिल्ह्यामध्ये पुन्हाएकदा खळबळ उडाली आहे. 2021 साली नांदेड जिल्ह्यात पोलीस भरती झाली होती. यामध्ये बालाजी तुकाराम ढवळे (रा. अंधापुरी ता. जि. बीड) पठाण आकिब रशीद पठाण (रा. कोरेगाव ता. पाटोदा जि. बीड) या दोघांनी भरतीत समांतर आरक्षणातून लाभ मिळवण्यासाठी बनावट प्रकल्पग्रस्ताचे प्रमाणपि सादर केले. या प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे आदेश नांदेड पोलीस अधिक्षकांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिल्यानंतर हे प्रमाणपत्र बोगस असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी माणिक डोके यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात बालाजी ढवळे आणि आकिब पठाण या दोघा जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक मृत्योपोळ हे करतआहेत. दरम्यान मध्यंतरी बोगस प्रमाणपत्राची चर्चा बीड जिल्ह्यात चांगलीच झाली होती. बोगस प्रमाणपत्र काढून देणारी टोळी जिल्हयात सक्रिय आहे. या प्रमाणपत्राच्या आधार अनेकांनी नोकर्यासुद्धा मिळवलेल्या आहेत. या सर्वांच्या प्रमाणपत्रांची चौकशी सुरू आहे. नांदेड येथील प्रकार उघडकीस आल्यानंतर पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!