Uncategorized

दिव्यांगांच्या व्यथा कमी करण्यासाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, दुर्लक्षित घटकांसाठी बैठक घेऊन खा.प्रितमताई मुंडे यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

बीड । दि. ०१ ।
देशातील दिव्यांगांना समाज धारेच्या आणि व्यवस्थेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ गरजू दिव्यांगांना मिळाला तर त्यांचे जीवन कष्टमुक्त होईल. शासकीय योजनांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांच्या व्यथा कमी करण्यासाठी गतिमान प्रयत्न व्हावेत, यासर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा अशा सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.

बीड जिल्ह्यातील दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनातील त्यांच्या अडचणी कमी व्हाव्यात याकरिता खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनाची बैठक घेतली. जिल्ह्यातील अपंगांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता अपंगत्वाच्या प्रमाणपत्राचे प्रस्ताव प्रलंबित ठेवू नका,यासाठी विशेष शिबीर आयोजित करा अशा सूचना त्यांनी दिल्या.

दिव्यांगजनांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून वंचित लोकांची नोंदणी करण्याबाबत सांगताना उत्पनाच्या दाखल्याची अडचण सोडवण्यासाठी देखील विशेष मोहीम राबविण्याची सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी केली.

त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कार्यवाही करा ; वार्षिक अहवाल ही मागविला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के निधी दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद असताना काही संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समितीसह इतर संस्था हा राखीव निधी खर्च करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, हा निधी दिव्यांगांच्या हक्काचा आहे.त्यांचे जीवन सुखद होण्यासाठीच खर्च व्हावा, ज्या संस्था निधी अखर्चित ठेवतील अथवा निधीचा गैरवापर करतील त्यांच्यावर कार्यवाही करा, मागील वर्षातील आणि चालू आर्थिक वर्षातील राखीव निधीची माहिती आपल्याला तात्काळ सादर करा अशा सूचना खा.प्रितमताई मुंडे यांनी बैठकीदरम्यान दिल्या.

••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!