Uncategorized

पंकजाताई मुंडेंनी कार्यकर्ते, नागरिकांसोबत ऐकली पंतप्रधानांची ‘मन की बात’, मन की बात माझ्यासाठी आस्थेचा विषय – पंतप्रधान मोदींनी साधला जनतेशी संवाद

परळी वैजनाथ ।दिनांक ३०।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम कार्यकर्ते, नागरिकां समवेत बसून ऐकला. पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून जनतेशी संवाद साधतांना हा कार्यक्रम माझ्यासाठी आस्थेचा विषय असल्याचे सांगून सरकारने आखलेल्या अनेक कल्याणकारी योजनांचा उहापोह यात केला.

'मन की बात' चा आज शंभरावा भाग होता. दूरदर्शन, आकाशवाणी वरून याचे थेट प्रसारण करण्यात आले होते. पंकजाताई मुंडे यांनी सकाळी ११ वा. आपल्या यशःश्री निवासस्थानी रेडिओवरून   कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकां समवेत सहभागी होत पंतप्रधानांचे विचार ऐकले. 

यावेळी जनतेशी संवाद साधतांना पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’ मधून अनेक विषयांवर मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘मन की बात’ मुळे मी सर्व सामान्य जनतेशी जोडला गेलो.अनेक समस्यांचं यातून निरसन झाले. जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हजारो लोकांच्या भावना मला वाचता आल्या शिवाय आत्मनिर्भर भारतामुळे रोजगार वाढला. हर घर तिरंगा मोहिम यातूनच यशस्वी झाली. स्वच्छता अभियान राबवले गेले त्यामुळे पर्यटन वाढल्याचे मोदी म्हणाले. मन की बात देशाला प्रगतीपथावर नेण्याचं एक साधन ठरलं असल्याचं ते म्हणाले.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!