Uncategorized

महामानवांच्या जन्मोत्सव सोहळयाला बीडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- डॉ. योगेश भैया क्षीरसागर, महामानवांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडेंच्या गायनाचा कार्यक्रम

बीड, दि. १५ (प्रतिनिधी) फेब्रुवारी महिन्यात योगेश पर्वाच्या वतीने भव्य दिव्य, ऐतिहासिक, शिवजन्मोत्सव साजरा केल्यानंतर आता योगेश पर्वात भिमोत्सव देखील भव्य दिव्य आणि अभूतपूर्व साजरा होणार आहे. आपल्या अभिनव उपक्रमांतून सातत्याने बीडकरांची मने जिंकणारे डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांच्या परिपक्व नियोजनातून सुरेल सुरांनी देशाची कानेकोपरे मंत्रमुग्ध करणाऱ्या महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध, लोकप्रिय गायिका विजेत्या वैशाली माडे यांच्या सुरेल स्वरांच्या अभूतपूर्व मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून महापुरुषांच्या जयंती निमित्त सामाजिक, संस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे बीड च्या शहरी आणि ग्रामीण भागातून या कार्यक्रमांना अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतोय. यावर्षी देखील
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जन्मोत्सव २०२३ चे औचित्य साधून युवा नेतृत्व डाॅ.योगेश क्षीरसागर यांनी सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या नियोजन संदर्भात

पूर्व नियोजन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासंदर्भात उपस्थित समाज बांधवांकडून, कार्यकर्त्यांकडून सूचना ऐकून घेण्यात आल्या. तसेच हा कार्यक्रम घराघरात कसा पोहचवता येईल यावर देखील चर्चा झाली. गेल्यावर्षी वैशाली माडे यांच्या कार्यक्रमाला बीड अभूतपूर्व प्रतिसाद दिला होता. त्यामुळे यावर्षी देखील त्यांचाच भीम गीतांचा कार्यक्रम बीड च्या जनतेसाठी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम मंगळवार दिनांक १८/०४/२०२३ सायंकाळी ६ वाजता पारस नगरी, माने कॉम्प्लेक्स समोर, बीड येथे संपन्न होत आहे. बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमातील ‘पिंगा’, कलंक या हिंदी सिनेमातील ‘घर मोरे परदेसिया’ अशा सुपरहिट हिंदी चित्रपटातील गाण्यांनी रसिकांच्या मनात घर करणाऱ्या मराठमोळ्या गायिका वैशाली माडे यांच्या कर्णमधुर सुरांत ज्ञानाचा अथांग सागर असणाऱ्या महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करण्यासाठी बीडकरांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सुकता दिसून येत आहे. या कार्यक्रमाकडे अवघ्या बीडवासियांचे लक्ष लागले असून बीड शहरातील तरुणाईने मोठ्या उत्सहात फेसबुक, व्हाट्सअँप, इंस्टाग्रामवर सर्वत्र बीडमध्ये होणाऱ्या वैशाली माडे यांच्या कार्यक्रमाचे पोस्टर तथा त्यांच्या गीतांचे व्हिडिओ वायरल केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या उत्साहाने भिमोत्सव साजरा करण्यासाठी तयारीला लागलेल्या डॉ. योगेश भैया क्षीरसागर यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या सुसज्ज नियोजनात आकर्षक विद्युत रोषणाई, दर्जेदार साउंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे तर महिलां आणि पुरुषांसाठी व पत्रकारांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था केली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे.
यावेळी पूर्व नियोजन बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. योगेश भैया क्षीरसागर म्हणाले की, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त बीड शहरासह तालुक्यात चांगला उत्साह पहावयास मिळत असतो. हा उत्साह पाहून आपण देखील समाज उपयोगी कार्यक्रम सुरू केले. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त आपल्या वतीने चांगले कार्यक्रम आयोजित केले आणि त्या कार्यक्रमांना बीडवासियांनी खूप मोठा प्रतिसाद देऊन यशस्वी केले. यावर्षी देखील क्रांतीसुर्य महात्मा फुले व महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जन्मोत्सव २०२३ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी आणि शांततेत पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या समित्या तयार करून त्यांच्यावर कार्यक्रमाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व कार्यकर्त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून प्रसिध्दी करून बीडकरांपर्यंत कार्यक्रमाची माहिती पोहोचवावी. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या सूचना ऐकून घेतल्या व त्या अंमलात आणल्या जातील असे सांगितले. यावेळी भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, विनोद मुळूक, भैय्यासाहेब मोरे, ॲड.विकास जोगदंड, रणजीत बनसोडे यांच्यासह समाज बांधव आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.बीडवासीयांनी मोठ्या संख्येने वैशाली माडे यांच्या सुरेल स्वरांच्या मैफिलीत उपस्थित राहून या अभूतपूर्व सोहळयाचे साक्षिदार व्हावे आणि मनसोक्त आनंद घ्यावा असे जाहीर आवाहन डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह डॉ.सारिकाताई क्षीरसागर, तसेच योगेश पर्व च्या टीम ने बीडकरांना केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!