Uncategorized

परळीतील अमर मैदानाने घेतला मोकळा श्वास ; कचऱ्याचे ढीग पालिकेने अखेर हटवले, पंकजाताई मुंडे यांच्या तत्परतेला रहिवाशांनी केला सॅल्यूट !

जनतेच्या समस्या सोडवणं माझं कर्तव्यच ; ते पार पाडतच राहील - पंकजाताई मुंडे

परळी वैजनाथ ।दिनांक ०५।
शहराच्या बाजीप्रभू नगर आणि पंचवटीनगर परिसरात असणाऱ्या अमर मैदानाने अखेर मोकळा श्वास घेतला आहे. मैदानातील कचऱ्याचे ढीग पालिकेने हटवल्याने परिसर दुर्गंधीमुक्त झाला आहे. याकामी जनतेची बाजू घेऊन पालिकेला फैलावर घेणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या तत्परतेला रहिवाशांनी सॅल्यूट करत त्यांचे आभार मानले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अमर मैदानावर कचऱ्याचे मोठ मोठे ढीग जमा झाले होते. शहराच्या वेगवेगळ्या भागातील कचरा याठिकाणी आणून टाकला जात असल्याने रहिवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता, त्यांचे आरोग्य देखील यामुळे धोक्यात आले होते. अनेक वेळा सांगूनही पालिका रहिवाशांना दाद देत नव्हती. शेवटी कंटाळून या भागातील रहिवाशांनी विशेषतः महिलांनी एकत्र येऊन नगरसेविका उमाताई समशेट्टे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, नितीन समशेट्टे, चंदाताई ठोंबरे यांच्यासह पंधरा दिवसापूर्वी पंकजाताई मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले होते. पंकजाताईंनी लगेचच पालिकेचे मुख्याधिकारी कांबळे यांना याचा जाब विचारत फैलावर घेतले होते. पालिकेने यानंतर तातडीने हालचाली करत मैदानातील कचरा हटवला आणि हा परिसर दुर्गंधीमुक्त केला. पंकजाताईंच्या दणक्यामुळेच ही कार्यवाही होऊ शकल्याने या भागातील रहिवाशांनी समाधान व्यक्त करत त्यांच्या कार्याला सॅल्यूट ठोकला व आभार मानले.

हे तर माझं कर्तव्यच

नागरिकांच्या समस्या सोडवणं हे माझे कर्तव्य आहे. विशेषतः महिलांच्या समस्यांची तात्काळ सोडवणूक करण्याकरिता मी सदैव प्रयत्न करत असते आणि करत राहील अशा शब्दांत ट्विट करत पंकजाताई मुंडे यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!