Uncategorized

कलेक्टरांमधील कर्तव्यदक्षपणा जिल्ह्याने पाहिला, भर उन्हात दिपा मुधोळ यांनी केली विकास कामांच्या जागांची पाहणी, परळीत लवकरच होणार केंद्रीय विद्यालय, नगर-बीड-परळी रेल्वेच्या ‘प्रोच रेल्वे पटरी’चाही घेतला बारकाईने आढावा


परळी, दि. ्3 (लोकाशा न्युज) : बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी् नियोजित स्व. बाळासाहेब ठाकरे शासकीय रुग्णालयासह अन्य विकास कामांसाठी जागांची भर उन्हात विविध प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत पाहणी केली. अशा प्रकारची पाहणी करणार्‍या आजतागायतच्या परळीच्या इतिहासात दीपा मुधोळ-मुंडे या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या असून त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी परळी शहरात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी परळी वैजनाथ येथे केंद्रीय विद्यालय परळी तालुक्यात चालू करण्यासाठी जागेची पहाणी केली, परळी नगरपालिका हद्दीत भुयारी गटार योजना अंतर्गत चालू असलेल्या कामांची पहाणी केली, परळी शहरात हिंदू-हदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू करण्यासाठी जागेची पहाणी केली, परळी शहरात तालुका क्रिडा संकुलसाठी जागेची पहाणी केली, परळी- नगर रेल्वे साठी प्रोच रेल्वे पटरी साठी पहाणी केली, अशा प्रकारची पाहणी जिल्हाधिकार्‍यांनी भर दुपारी दुपारी 12 ते 3.30 या वेळेत भर उन्हात पहाणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाने, तहसीलदार सुरेश शेजूळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी त्रिबक कांबळे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय केंद्रे, न.प,चे कार्यालय अधिक्षक संतोष रोडे, डॉ लक्षमण मोरे तालुका आरोग्य अधिकारी, कनाके गशिअ आदी सोबतच संबधित विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. देशात स्वातंत्र्य मिळाल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये अनेक जिल्हाधिकारी होऊन गेले आजतागायतच्या परळीच्या इतिहासात प्रासंगीक भेटी व्यतिरिक्त आगामी काळात नियोजित विकास कामे आणि चालू असलेल्या कामांना भेटी देत जागांची पाहणी करणार्‍या बीडच्या विद्यमान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे या पहिल्या जिल्हाधिकारी ठरल्या आहेत. यावरूनच त्या येणार्‍या आगामी कामांसाठी आणि सुरू असलेल्या विकास कामांसाठी किती दक्ष आहेत हे दिसते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!